अकोला प्रतिनिधि गणेश वाडेकर
तेल्हारा पोलिस स्टेशनांतर्गत येणाऱ्या शेरी येथील रहिवाशी सिद्धेश्वर शंकर खारोडे (६४) यांना गावातीलच रहिवाशी राहुल गोपालकृष्ण बावस्कार (२७), शुभम गोपालकृष्ण बावस्कार (२९) या आरोपींनी संगनमत करून लोखंडी पाइपने मारहाण केली. फिर्यादी रवींद्र सिद्धेश्वर खारोडे (३५) रा. शेरी तालुका तेल्हारा यांचे जबानी रिपोर्टवरून व मेडिकल मेमोवरून तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

