महाक्रांती न्यूज नेटवर्क: – युसूफ पठान (उपसंपादक)
वर्धा नजिकच्या वरूड येथे नवरात्री उत्सवा निमित्त दरम्यान ग्रामोत्सव साजरा करण्यात आला. या कालावधीत सक्षम वेलफेअर सोसायटी च्या वतीने नियमित ध्यान व सामुदायिक प्रार्थनेचे, देवीचा गोंधळ इ. आयोजन करण्यात आले होते. तसेच रक्तदान शिबिर, मुलांसाठी विविध खेळाचे आयोजन केले होते.
ज्यात फुगा दौड, फुगा फोड, बिस्कीट खाणे, नाकाने बॉटल मध्ये पेन टाकणे, चित्रकला स्पर्धा, धावणी, नृत्य स्पर्धा तर महिलांसाठी उखाणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गर्भा नृत्य इ. विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समाजप्रबोधना साठी राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. रामपाल धारकर, तसेच गणेश महाराज चांदेवार यांचा कार्यक्रम घेण्यात आला., “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान अंतर्गत भव्य रोग तपासणी, निदान, उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील २०० हून अधिक ग्रामस्थांनी या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून औषधोपचार देखील घेतले.
संस्थेच्या वतीने सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीसाचे वितरण करण्यात आले.
संस्थेचे सभासद अमोल कुकडे, संचिता खंडारे, अजय अंबुलकर, किरण परचाके, रोशन तिवरे, पीयुष देऊळकर, नितीन ठाकरे, जगदीश डोळसकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

