दोन्ही तालुक्याचा समावेश करण्याची मागणी
सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महागाव दि 10
राज्यात जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधिताना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत दिनांक 9 ऑक्टोंबर 2025 ला निघालेल्या महसूल व वन विभाग यांच्या शासन निर्णयांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बारा तालुक्याचा समावेश करून जास्त प्रमाणात नुकसान झालेल्या महागाव व उमरखेड या दोन्ही तालुक्याला डावळल्याने शेतकऱ्यांना आत्महत्येची पाळी येणार असल्याने संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या उमटत असून या दोन्ही तालुक्याचा समावे्श या शासन निर्णयात करण्यात यावा अशी मागणी सौ संध्या संदेश रणवीर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार महागाव तालुका यांनी मुख्यमंत्री महसूल मंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे
आयुक्त व कृषी विभागाकडून नुकसानी बाबत माहिती गोळा करून शासनाला अहवाल पाठवण्यात आला आहे त्यावर मदतीची घोषणा होऊन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यवतमाळ जिल्ह्यातील बारा तालुक्यांचा समावेश असून उमरखेड व महागाव या तालुक्याला या विशेष पॅकेज मधून डावलण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे

तरी या दोन्ही तालुक्याचा समावेश या मदत पॅकेजमध्ये करण्यात यावा व नुकसान ग्रस्त्राना मदत मिळावी अशी मागणी केली आहे
राज्यातील 253 तालुक्यांमध्ये खरीप हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे शेत पिकाचे नुकसान, जमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर परझड, घरातील वस्तू व साहित्याचे नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्या जिल्ह्यातील त्या बाधित तालुक्याची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त महागाव व उमरखेड या दोन तालुक्याचा समावेश नसणे निंदनीय बाब आहे.
या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण हे सर्वात जास्त होते व सर्वात जास्त नुकसान या दोन तालुक्यांमध्ये झालेले असताना या तालुक्यावर होत असलेला अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही याबाबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा इशारा सौ संध्या रणवीर यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री तथा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे

