महाक्रांती न्यूज नेटवर्क: –
श्री माता महाकाली महोत्सव २०२५ अंतर्गत भव्य नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री माता महाकाली मंदिर परिसरातून या सोहळ्याला प्रारंभ झाला.
या नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्यात भक्तिभाव आणि कलात्मकतेचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. भव्य पन्ना गिल रोड शो, आकर्षक झांकी, पारंपरिक नृत्यांची सादरीकरणे तसेच गंगाआरतीसारखे भावस्पर्शी देखावे पाहून वातावरण उत्साहात न्हाऊन निघाले.

शहरातील नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने सहकुटुंब उपस्थित राहून या सोहळ्यात सक्रिय सहभाग नोंदविला. विशेषत: युवकांचा उत्साह आणि सहभाग पाहून वातावरण भारावून गेले. भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला

आणि प्रत्येकाच्या मनात अपार आनंद व समाधानाची भावना निर्माण झाली. माता महाकालीच्या पालखीचे दर्शन घेऊन आणि आशीर्वाद प्राप्त करून शहरवासीयांनी एक अविस्मरणीय अध्यात्मिक अनुभव घेतला.


