कंधार प्रतिनिधी, ज्ञानेश्वर कागणे
कंधार नगर परिषदेच्या एकूण दहा प्रभागातील २० सदस्य संख्येच्या जागेचे उप जिल्हाधिकारी सचिन खल्लाळ यांचे हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात दहा जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यांत आल्या आहेत.
प्रभाग क्र. १ - अ अनु.जाती (महिला), ब - सर्वसाधारण
प्रभाग क्र. २ – अ नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र.३ – अ नागरिकांचा मागासप्रवर्ग, ब – सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र.४ – अ नागरिकांचा मागासप्रवर्ग ( महिला ), ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र.५ – अ नागरिकांचा मागासप्रवर्ग, ब – सर्वसाधारण ( महिला )
प्रभाग क्र.६ – अ अनु.जाती, ब – सर्वसाधारण ( महिला )
प्रभाग क्र. ७ – अ अनु.जाती ( महिला ), ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ८ – अ अनु.जाती ( महिला ), ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ९ – अ अनु.जाती, ब – सर्वसाधारण ( महिला )
प्रभाग क्र. १० – अ नागरिकांचा मागासप्रवर्ग ( महिला ), ब – सर्वसाधारण
या सोडतीत अशाप्रकारे अनु.जातीसाठी पाच, ओबीसीसाठी पाच तर सर्वसाधारण साठी एकूण दहा जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या आरक्षण सोडतीमुळे प्रत्येक प्रभागातील इच्छूक उमेदवार आपापल्या कामाला लागणार असून गोरगरीब मतदाराची दिवाळी आनंदात जाण्याची शक्यता आहे.

