महाक्रांती न्यूज नेटवर्क: – अंकुश जाचक
अखिल भारतीय मराठा महासंघ द्वारा आयोजित मराठा भूषण पुरस्कार हा विदर्भातील पदाधिकारी निवड समारोह नुकताच पार पडला. हा समारंभ रविवार दि. ५/१०/२०२५ श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर येथे ,अखिल भारतीय मराठा महासंघाच्या १२५ व्या वर्धापण दिनानिमित्य साजरा करण्यात आला असून,वर्धा येथील समाजिक कार्यकर्त्यां शैलजा साळुंके वर्धा ह्या बरेच वर्षा पासून समाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
तर त्या अखिल भारतीय मराठा महासंघ वर्धा जिल्हाअध्यक्ष्य आहे.त्यांनी पदाचा योग्य वापर करून समाजाला योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा देण्याचे काम हे नेहमी त्यांच्या कार्यातून दिसत असते.समाजात वावर्ताना त्या नेहमी कोणताही भेदभाव न करता .समाजाशी एक रूप एक निष्टेने ,आपली नैतिक जबाबदारी म्हणून कार्यरत असतात.त्यांचा हा समाजिक कार्याचा द्यास लक्ष्यात घेता मराठा भूषण, रत्न हा पुरस्कार बहाल करण्यात आला. वर्धायेथील दादाजीधुनिवालामठ येथे माँ जिजाऊ स्मारक आहे. परंतु त्या स्मारकाला कागदी पोस्टर खिळाने लावण्यात आले होते.
त्यांनी त्या स्मारकावर पर्मनंट शिल्प बसविण्याकरिता साकळी उपोषणकरून कलेक्टर निवेदन देऊन शिल्प बसविण्यास भाग पाडले. यात त्यांनी मोलाची कामगिरी बाजावली,ऐवढच नाही तर यांना साहित्य ,वाचन,लेखणा बद्दल रुची असून त्या कवी सुद्धा आहे. साहित्य लेखनावर त्यांची पकड असून नेहमी,त्यांचं कविता ,लेख,साहित्य प्रकाशित होतांना बघायला मिळते. तर त्या निसर्ग प्रेमी सुद्धा आहे.दरवर्षी समाज बांधवाना घेऊन वृक्ष रोपण हा कार्यक्रम ठरला असतो.एवढंच नाही तर समाजिक विषयावर ,विध्यार्थी यांच्या कला,गुण,कैशल्या,क्रीडा,ह्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून अनेक शाळा, कॉलेज मध्ये जाऊन विविध उपक्रम स्पर्धांचे आयोजन सुद्धा शैलजा ताई कडून होत असते.तर महिला सक्षमीकरन ह्या महत्वाच्या कार्यातही त्या मागे नाही.त्यांचे नेहमी प्रयत्न असते.तसेच त्यांना अनेक पुरस्काराने गैरविण्यात आले आहे.ह्या त्यांच्या समाजिक उल्लेखनीय कार्यामुळे समाजात व समाजासमोर त्यांची प्रतिमा आरश्या सारखी स्पस्ट आहे.
वरील सर्व कार्याची दखल घेऊन च हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला असून,मराठा भूषण पुरस्कार राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिलीप दादा जगताप तसेच राष्ट्रीय सरचिटणीस श्री संभाजी राजे दहातोंडे, सहित इतर मान्यवरांचे हस्तेपुरस्कार म्हणजे, गौरव तुमच्या कार्याचा, सन्मान निष्ठेचा, गौरव तुमच्या कर्तृत्वाचा ह्या शाब्दिक सुमनाने मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह ,सन्मान पत्र,देऊन शैलजा साळुंके वर्धा यांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन गैवरव करण्यात आला.ह्या वेळी शैलजा साळुंके यांनी आनंद वेक्त करत सर्व मान्यवरांचे ,आयोजकांचे,आणी सर्व शुभचिंतक समाज बांधवांचे आभार वेक्त केले.

