बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी: – सुनील वर्मा
लोणार तहसीलवर ८ ऑक्टोबर बुधवारी देशाचा पोशिंदा शेतकरीराजा अतिवृष्टीने पोटाच्या गोळ्यासारखं वाढवलेल पिकाचे चिखल झाल्याने आज तो मरणकळा भोगत आहे त्यांच्या न्यायाहक्कासाठी शिवसेना उबाठाचे तहसिलवर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन
तीन तिगाड, महाराष्ट्र सरकार हे खोटे आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहे, शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण होण्याकरिता जनमनातील मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन होणार आहे त्यातील प्रमुख मागण्या
१) तत्काल ओला दुष्काळ जाहीर करा.
२) शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांचा सातबारा कोरा करा.
३) शेतकऱ्याचे विज बिल तत्काळ शून्य करा.
४) शेतकऱ्यास ५० हजार हेक्टरी नुकसान भरपाई द्या. आता नाही तर कधीच नाही ही जीवन मरणाची परिस्थिती निर्माण झाली आहे
करिता, शेतकरी राजांनी मोठ्या संख्येने तहसील कार्यालय येथे या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हासंपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी केले आहे.
अशी माहिती जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

