– हिंगणघाट शहरात लवकरच होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. प्रभाग क्रमांक ११ निशानपुरा वॉर्डमधून तरुण पत्रकार मोहसिन खान यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. हिंगणघाटमध्ये दबंग पत्रकार म्हणून ओळखले जाणारे मोहसिन खान नेहमीच गुन्हेगारीशी संबंधित बातम्या उघडकीस आणतात.
मागील नगरसेवकांचे काम प्रभावी नसल्याने मतदार नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत आहेत. यात मोहसिन खान हे युवकांचे आवडते उमेदवार ठरत आहेत, कारण ते लोकांच्या हितासाठी लढतात आणि पत्रकारितेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी योगदान देतात.
निशानपुरा वॉर्डमधील समस्या – रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रोजगार – या सोडवण्यात मागील नेत्यांना यश मिळाले नाही, असे नागरिक सांगतात. यामुळे युवक आणि नागरिक मोहसिन खान यांच्याकडे आकर्षित होत आहेत. मोहसिन यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकदा वॉर्डमधील समस्यांचे निराकरण केले आहे. “मोहसिन खानच्या एका फोनवर प्रशासन हलते आणि काम होते,” असे स्थानिक नागरिक सांगतात. युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे,
प्रभाग क्रमांक ११ मध्ये सुमारे ५००० मतदार असून, यात ६० टक्के युवक आहेत. मोहसिन यांचा पत्रकारितेतील दबंग अनुभव आणि सामाजिक कार्य त्यांना निवडणुकीत आघाडीवर ठेवते. “मोहसिन खान काम करणारे समान सेवक आहेत,” निवडणुकीत कोण जिंकणार, हे मतदार ठरवतील, पण मोहसिन खान पत्रकार यांचे नाव निशानपुरा वॉर्डमधील प्रत्येकाच्या मनात आहे. त्यांच्या कार्याने हिंगणघाटच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा आहे.

