वर्धा: युसूफ पठान
आज हिंगणघाट. तिथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख श्री राजेंद्रखुपसरे, उपजिल्हाप्रमुख मा. श्री. सतीश धोबे तथा तालुकाप्रमुख श्री. मनीष देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तथा माजी उद्योग राज्यमंत्री माजी आमदार श्री अशोक भाऊ शिंदे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये ची मदत देण्याकरिता तसेच मागील वर्षी विधानसभा निवडणूक पूर्वी महायुती द्वारे ( भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट तथा शिवसेना मिंदे गट ) घोषणापत्रात राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून सातबारा कोरा.. कोरा.. कोरा… करू असे म्हणणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध!!! करून या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्याकरिता या शासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पक्षाचे पक्षप्रमुख यांनी काढलेल्या आदेशामुळे राज्यात ठीक – ठिकाणी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता .परंतु सरकारने या मोर्चाचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. हेक्टरी साडेआठराहजार रुपये देण्याचे मान्य केले. परंतु ही मदत कमीत – कमी ५० हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना मिळावी. याकरिता शिवसेना हिंगणघाट शाखेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या मोर्चाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. या मोर्चात सहभागी श्री. गोपाल मेघरे यांनी शेतकरी हा कर्जबाजारीमुळे हवालदील झाला आहे. त्याच्या डोक्यात सतत कर्जाच्या डोंगरामुळे आत्महत्या करण्याची विचार निर्माण होत आहे. तसेच श्री. राऊत व श्री. सुधाकर इंगोले यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या व्यथा या मोर्चाच्या माध्यमातून मांडल्या.
मोर्चाकरिता व निवेदन देण्याकरिता शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने पदाधिकारी , शिवसैनिक तथा शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.सर्वश्री प्रकाश अनासाने, सुनील आष्टीकर, शंकर झाडे ,नंदू रेडलावार,अमोल वादाफळे, गजानन काटोले, सुधाकर डंभारे, श्रीधर कोटकर, दिलीप चौधरी, विनोद मोहोड, निलेश मानकर, करण जणेकर, केशव तळवेकर, अरुण राऊत, दिलीप कुकडे ,लक्ष्मण कापकर, जीवन राऊत ,राहुल कुकडे, सुभाष काटकर, अमोल कुकडे ,बाळू खळतकर, अशोक तडस, गुलाब कुंभारे ,हेमराज हरणे, नाना ठोंबरे ,आशिष भांडे ,गजानन सातारकर, योगेश ठक, दीपक राजुरकर ,अनिल मून,नत्थुजी कुकडे, गोपाल चौधरी,गजानन ठाकरे, जयप्रकाश चंदेल, सुधाकर अगडे, नईम शेख, प्रमोद धोटे ,दिनेश धोबे, शहजाद खान, धणेश नवघरे, दिलीप वैद्य, पप्पू घवघवे ,किसना साखरकर ,भुजंग मेघरे, विलास चौधरी ,अशोक गिल्लोरकर ,गुणवंतराव वानखडे ,चंद्रशेखर तडस, दीपक रायमुलकर ,रामराव रहाटे, विजय कोरडे, संजय रहाटे, उत्तम भोंबले, हरिदास कंकलवार ,मधुकर शेंडे, रतन कुंभारे ,मंगेश मगरे, संजय पिंपळकर, रामदास कुबडे, बालाजी ठग , अनंता सोरटे ,लक्ष्मण बकाने, गौरव गाडेकर,नितीन वैद्य, अनंता गलांडे,हिरामण आवारी,शकील अहमद,नरेश खुरपुढे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

