2025 ” नाट्य चित्रपट कलाकार तसेच साहित्यिक लेखक श्री. भरत काळे यांना यंदाचा ” जीवन गौरव पुरस्कार मिळाला, सरकारमान्य संस्थांचे ३ पुरस्कार मिळाले आहेत.त्यांनी जांभूळ आख्यान या नाटकात काम केले आहे, जिंदगी का साथ निभाता चला गया आत्मकथन लिहिले आहे आणि त्या आत्मकथनाला १३ पुरस्कार मिळाले आहेत शास्त्रीय संगीताची परिक्षा हि पास झालेले आहेत असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व .संस्थेचे सर्वेसर्वा श्री प्रदीप मोरे सर यांनी हा पुरस्कार त्यांनी त्यांच्या निवड समिती तर्फे जाहीर केला.
दिनांक 04/10/2025 रोजी ठीक चार वाजता ” जानकीबाई कृष्णा मढवी हॉल, तिसरा मजला, प्लाट नंबर 10, चिंचववली मैदानाच्या जवळ , सेक्टर 5,ऐरोली, नवी मुंबई. येथे संपन्न झाला, जीवन गौरव पुरस्कार, जीवक फाउंडेशन चे जनक ,आणि समाज सेवा हाच धर्म समजणारे माननीय श्री डॉक्टर पंचदेव गौतम यांच्या हस्ते श्री भरत काळे यांना देण्यात आला.
गीत सुहाने इंटरटेनमेंट चे श्री प्रदीप मोरे सरांनी कार्यक्रमाची आखणी आटोपशीर केली, कार्यक्रम कुठेही रेंगाळनार याची खबरदारी घेतली, विद्या ताई अहिरे यांनी निवेदनाची भूमिका उत्तम निभावली. कार्यक्रमाचे आयोजन शोभा ताई नागावकर ,मधुकर दादा वरळीकर, बाबुराव कांबळे, वैभव नागपुरे, अरुण जोशी,फिलोमीना कदम, झऊर बोरकर सर यांनी उत्तम पार पाडली, कार्यक्रमाची सांगता श्री प्रदीप मोरे यांच्या कव्वाली ने झाली, लोकानी कव्वाली वर ठेका धरला.
खर्डी प्रतिनिधी:- सगीर शेख

