गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
MIM संपूर्ण प्रभागात उमेदवार लढविणार MIM जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख झाशी राणी नगर प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढवणार
गडचिरोली शहरात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद निवडणूकीत सर्वसाधारण महिला आरक्षणातून MIM पक्ष पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार आहे
*MIM पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत MIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख यांची पत्नी महिला कार्याध्यक्षा सौ. शगुफ्ता बाशिद शेख यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून एक मताने निवड करण्यात आली.
या वेळी MIM जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, महिला जिल्हा उपाध्यक्ष जयाताई कोंडे, उज्वला सिरसाठ,जिल्हा उपाध्यक्ष विपिन सूर्यवंशी, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, गोरक्षक दलाचे जिल्हा अध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा अध्यक्ष तौफिक सय्यद, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, शहर अध्यक्ष स्वप्निल साळवे, अनिल संतोषवार, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुस्ताक सय्यद, तालुका अध्यक्ष करणं मोहुर्ले, जावेद शेख, रेहान अन्सारी, रेहान शेख, आदि उपस्थित होते.

