गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
गडचिरोली:- चेरपल्ली रस्त्याचे दुरावस्था झाली असून ठीक ठिकाणी मोठ मोठे जीवघेणे खड्डे पडून त्यांचे पाण्याचे डबक्याचे रूपांतर झाले असल्यामुळे शाळक
री विद्यार्थ्यांना तसेच गावातील गरोदर महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या लक्ष वेधण्यासाठी पाण्याच्या खड्ड्यात बसून आंदोलन करून मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे नवीन रस्ता तत्काळ बनविण्यात यावे म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

गेल्या ५ ते ६ वर्षापासुन जिल्हा परीषद बांधकाम उपविभाग अहेरी वरून चेरपल्ली जाणा-या रस्त्याची कोणत्याही प्रकारची देखभाल किंवा दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे चेरपल्ली वरुन अहेरी मुख्यालयी जाण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना तसेच गावातील गरोदर महिलांना व सामान्य नागरिकांना यांचा शारिरीक नाहक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे नगर पंचायत अहेरी कडे रस्ता हस्तांतरीत करण्यात यावे म्हणुन अनेकदा जिल्हा
परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भेट देण्यात आले, त्यानंतर अनेकदा निवेदन देऊन आंदोलन दोलन देखील करण्यात आले होते. त्यामुळे मागील दोन महिन्या पुर्वी नगर पंचायत अहेरी कडे रस्ता हस्तांतरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्याची अती दुरावस्था झाल्यामुळे अहेरी मुख्यालयी शाळेत किंवा रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी गावातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्था मुळे अनेकदा शाळकरी विद्यार्थ्यांना सायकलने जातांना खड्ड्यात पडुन अपघात देखील झाले आहेत. तसेच रस्त्यावर मोठ मोठे जीवघेणे खड्डे पडुन डबक्याचे रुपांतर झाले आहेत. रस्ता पुर्णत्व: खराब झाले असुन सर्वत्र गिट्टी उखडून
पडलेली आहे. त्यामुळे प्रती दीन अपघाताच्या घटना वाढत आहेत. रस्ता खराब असल्यामुळे सर्वात जास्त त्रास शाळकरी विद्यार्थ्यांना सहन करावा लागत

आहे. त्यामुळे रस्त्याचे नवीन बांधकाम करणे आवश्यक आहे. चेरपल्ली कडे जाणा-या रस्त्याची नवीन बांधकाम करुन नागरीकांना दिलासा देण्यात यावे म्हणून जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले.

