निलेश कोकणे:-सातारा जिल्हा प्रतिनिधी
शेतकऱ्याच्या दुःखापुढे तिजोरीचा विचार करायचा नाही! आपला शेतकरी बंधू संकटातून बाहेर पडला पाहिजे यासाठी देवाभाऊंनी आजपर्यंतचे सर्वात मोठे 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे…
कोरडवाहू जमिनींसाठी NDRFच्या निकषानुसार 8,500 रुपये, राज्य सरकारकडून 10,000 रुपये आणि पीकविम्याचे 18,000 रुपये मिळून एकूण ₹36,500 प्रति हेक्टर मदत मिळणार आहे.
हंगामी बागायती जमिनींसाठी एकूण ₹45,000 प्रति हेक्टर, तर
बागायती जमिनींसाठी तब्बल ₹50,500 प्रति हेक्टर मदत देण्यात येणार आहे.
जनावरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मोठा आधार देण्यात आला आहे. दुधाळ जनावरांच्या भरपाईवरील तीन जनावरांची मर्यादा रद्द करण्यात आली असून, प्रति जनावर ₹37,500 इतकी मदत दिली जाणार आहे.
ओढकाम करणाऱ्या जनावरांनाही आर्थिक मदत मिळणार आहे, तसेच प्रति कोंबडी ₹100 दराने भरपाई जाहीर करण्यात आली आहे.
खरडून गेलेल्या जमिनींसाठी रब्बी पिकासाठी ₹47,000 प्रति हेक्टर, आणि दुरुस्तीसाठी मनरेगाच्या माध्यमातून ₹3 लाख रुपये प्रति हेक्टर निधी देण्यात येईल.
विहिरींच्या दुरुस्तीसाठी ₹30,000 प्रति विहीर, तर पूरग्रस्त भागातील रस्ते, पूल, शाळा व इतर पायाभूत सुविधांसाठी ₹10,000 कोटींचा मोठा निधी राज्य सरकारने जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना नवजीवन मिळाल्याची भावना संपूर्ण देशभर व्यक्त होत आहे.

