अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
कुंकूच्या कार्यक्रमाला जात असताना अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील २१ ग्रॅम सोन्याची पोथ लुटून नेल्याची घटना घडली आहे. बोरगाव मंजू पोलिस स्टेशन टाऊनमध्ये रेणुका नगर स्थित एका घरी हळदी कुंकू कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रेणुकानगर स्थित महिला जात असताना भरवस्तीत दोन दुचाकीस्वारांनी पाळत ठेवून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ २१ ग्राम तोंडून दुचाकीस्वार अज्ञात दोन भामट्यांनी धूम ठोकली. दरम्यान सदर घटना घडली तेव्हा महिलांनी आरडाओरडा केला.

