अहेरी प्रतिनिधी:- प्रा. सुरेंद्र तावाडे
. मा. आदरणीय प्राचार्य शामशेरखान पठाण सर यांचा सेवापुर्ती सत्कार व प्रेरणापथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. अबूझमाड शिक्षण मंडळ गडचिरोली चे सचिव यांच्या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेंच बहुसंख्येनी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
शिक्षण सेवेत असताना उत्तम असे शैक्षणिक कार्य केले त्याच बरोबर अनेक विध्यार्थाना उच्च पदावरती विराजमान होण्यास महत्वाचे मार्गदर्शन केले. शिक्षणाचे महत्व ओळखून त्यांनी समाजसेवा वृत्ती बाळगुण शिक्षण हे गोरगरीब तळागाळातील प्रत्येक मुलांना मिळाले पाहिजे असा ध्यास घेऊन शैक्षणिक संस्था काढल्या. त्या संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली मधील अतिदुर्गम भागातील प्रत्येक गावामध्ये शिक्षण पोहचले पाहिजे त्यासाठी अनेक शाळा, महाविद्यालय काढले.या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक कार्य सुरु केले. वाढलेल्या काढील पालवी फुटावी आणि त्याचे विशालकाय वृक्ष व्हावे असे त्यांचे कार्य आहे.
या कार्यक्रमाला अनेक शिक्षण क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अब्दुल जमीर अब्दुल हकीम, विशेष अतिथी मा. डॉ. नामदेव किरसान खासदार (गडचिरोली-चिमूर क्षेत्र लोकसभा), मा. अभिजित वंजारी आमदार (विधान परिषद पदवीधर मतदार संघ) मा. सुधाकरराव अडबाले आमदार (विधान परिषद शिक्षक मतदार संघ), मा. डॉ. मिलिंद नरोटे आमदार (गडचिरोली विधानसभाक्षेत्र)मा. पेंटारामा तलांडी (माजी आमदार), मा. आनंदराव गेडाम (माजी आमदार) मा. विनोद भोसले सर (माजी जिल्हा आयुक्त स्काउठ, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त त्याच बरोबर परिवारातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते.


