शहापूर: सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय, शहापूर जि. ठाणे येथील अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष व क्रीडा व जिमखाना विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने दि. ७ व दि. ८ आॕक्टोबर, २०२५ रोजी मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन पुरुष व महिला कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन ज्ञानवर्धिनी संस्थेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष बाळा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेले आहे.
दि. ७ आॕक्टोबर, २०२५ रोजी पुरुष कुस्ती स्पर्धा तर दि. ८ आॕक्टोबर, २०२५ रोजी महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सलग दोन दिवस या भव्य कुस्ती स्पर्धेचा थरार पाहण्याचा योग सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना येणार आहे. या कुस्ती स्पर्धेच्या आयोजनातुन अनेक नवनवीन कुस्तीपट्टू निर्माण व्हावेत व शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यातील सुद्दृढ नागरिक निर्माण होऊन मजबूत देशबांधणी व्हावी, या उदात्त हेतूने सदरच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. सुरेशजी म्हात्रे (बाळ्या मामा), मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किसनजी कथोरे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दौलतजी दरोडा कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निरंजनजी डावखरे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य रविंद्र घोडविंदे साहेब, मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अशोकजी फर्डे साहेब, मुंबई विद्यापीठाच्या क्रिडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी साहेब, ज्ञानवर्धिनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष किशोरजी कुडव साहेब व मुंबई विद्यापीठातील अनेक मान्यवर अधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तसेच या स्पर्धेसाठी ज्ञानवर्धिनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे व कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आंतर-महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत मुंबई विद्यापीठाशी सलग्न असणा-या सर्व महाविद्यालयातील नामवंत कुस्ती स्पर्धक सहभागी होणार आहेत. सदरची कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानवर्धिनी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष बाळा पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर अधिकारी, सचिव दिलीप भोपतराव, विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाॕ. ए. के. सिंह, उपप्राचार्य, आय. क्यु. ए. सी.चे समन्वयक, महाविद्यालयाचा क्रीडा व जिमखाना विभाग, आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी कठोर परिश्रम करीत आहेत.
खर्डी प्रतिनिधी सगीर शेख

