खर्डी वन परीक्षेत्र हद्दीतील वडाचा पाडा येथे ज्ञानेश्वर मोहन गांजवे या शेतकऱ्याच्या म्हशींच्या गोठ्यात जाऊन बिबट्याने एका म्हशीच्या पारडावर हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने संबंधित शेतकऱ्याने वन विभाग खर्डी यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन दिले आहे.तसेच पळशीण येथील महमूद इकबाल ढोले या शेतकऱ्याच्या घराच्या मागच्या बाजूला बांधलेल्या बैलाला बिबट्याने पहाटे 5 वाजता हल्ला करून ठार केले आहे.
सदर बैल हा 3,वर्षाचा असून त्याची अंदाजे किंमत 25,000.इतकी आहे.दोन्ही पिढ्यांनी वनपरिक्षेत्र खर्डी येथील कार्यालयात लेखी स्वरूपात निवेदन देऊन भरपाईची मागणी केली आहे. घरांनच्या जवळच बिबट्याचा वावर असल्याने नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
खर्डी प्रतिनिधी सगीर शेख

