अहेरी प्रतिनिधी -प्रा. सुरेंद्र तावाडे
नागसेन बुद्ध विहार व संघामित्र बुद्ध विहार आलापली तथा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या माध्यमातून धम्म चक्र प्रवर्तन दिन अति उत्सहात साजरी करण्यात आली.
14ऑकटोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकर यांनी जी धम्मदीक्षा दिली तो दिवस आपण साजरा करतो तो दिवस होता, अशोका विजयादशमीचा, नागपूर भूमी मध्ये असंख्य बहुजनांना जी धम्म दिक्षा दिली, त्यामुळे बहुजनांचे जीवन उजाळून निघाले. 22 प्रतिज्ञा ज्या आपल्याला डॉ. बाबासाहेबानी धम्म दिक्षा घेताना सांगितल्या त्याचे अनुपालन करून चांगले जीवन जगू शकतो. त्यांचाच वारसा घेऊन आज आपण निर्भीड जीवन जगत आहोत.
. धम्म रॅली च्या माध्यमातून शांतीचा संदेश समाजामध्ये पसरविण्याचे कार्य केलेले आहे.
. आजचा कार्यक्रम सकाळी ठीक 09:00 वाजता धम्म ध्वज फडकिविण्यात आला, नागसेन विहाराचे अध्यक्ष मा. कोरडे साहेब यांच्या हस्ते ध्वजरोहानाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. लगेच धम्म रॅली चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी सर्व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. बाबासाहेब यांनी दिलेला बुद्ध धम्म व तथागत गौतम बुध्दानी सांगितलेला शांतीचा मार्ग यांचा जीवनात उपयोग करणे आवश्यक आहे हे सर्व बहुजनांनी विचारात घेतले पाहिजे.

