गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी:- आशिष लाकडे
-Disom fellowship ने सन्मानित
गडचिरोली जिल्हा नेहमीच सामाजिक चळवळींसाठी, संघर्षासाठी आणि परिवर्तनशील कार्यकर्त्यांसाठी ओळखला जातो. याच मातीतून घडलेले आणि तरुणाईचे प्रेरणास्थान ठरलेले नाव म्हणजे विनोद गुरूदास मडावी.
अल्पवयापासूनच जात-पात, धर्मभेद न पाहता न्याय, हक्क आणि अधिकारासाठी रस्त्यावर उतरणारे हे एक धाडसी आदिवासी नेतृत्व आहे. अन्यायाविरोधात आवाज उठविणे, शोषित-पीडित समाजाच्या प्रश्नांसाठी लढा देणे आणि सामान्य माणसाचा आवाज सत्तेच्या दालनात पोहचविण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न उल्लेखनीय आहे. विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी आजाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी म्हणून कार्य करताना जनतेच्या असंख्य प्रश्नांवर संघर्ष केला आहे.
या सामाजिक बांधिलकीची दखल घेत, देशातील अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी Youth Leadership Development Fellowship (Disom Foundation द्वारा संचालित) साठी विनोद मडावी यांची निवड झाली आहे. ही फेलोशिप देशभरातील केवळ अशा तरुणांना दिली जाते, जे समाजाच्या न्याय-अन्यायाच्या प्रश्नांवर प्रखरपणे लढा देतात आणि परिवर्तन घडविण्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात.
या फेलोशिपमध्ये केवळ महाराष्ट्रातील नाहीं तर भारत भरातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश मधून 21 जणांची निवड करण्यात आली. त्यात गडचिरोली मधून विनोद मडावी हे विशेष अभिमानाचे पाऊल आहे.

या एक वर्षाच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात –
- विविध राज्यांचा सामाजिक सांस्कृतिक, व राजकीय अभ्यास
- स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील समस्या व त्यांच्या मुळाशी जाणे
- अन्याय-अत्याचारांचे विश्लेषण
- प्रभावशाली व्यक्तींचे कार्य,
- सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी आवश्यक पावले
यांचा सखोल अभ्यास केला जात आहे. यामध्ये सहभागी होणे हेच नेतृत्वाच्या दिशेने एक मोठे यश मानले जाते.
दरम्यान, फेलोशिपच्या पहिल्या तीन महिन्यांचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजाद समाज पार्टी व विविध सामाजिक संघट्नांच्या वतीने विनोद गुरूदास मडावी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर उपस्थित राहून मडावी यांचा गौरव केला. याचे संपूर्ण श्रेय पत्नी, आई- वडील तसेच कुटुंब आणि मित्रपरिवार ह्या सगळ्यांना जाते असे विनोद मडावी हे म्हणाले.
हा कार्यक्रम केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि न्याय, हक्क व सामाजिक बांधिलकीच्या कार्यात नवचैतन्य निर्माण करणारा असल्याचे प्रतिपादन धर्मानंद मेश्राम यांनी केले. सत्कार कार्यक्रमात आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, हंसराज उराडे, सविता लभाने, विवेक खोब्रागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होतें.

