सिद्धार्थ कदम :- पुसद तालुका प्रतिनिधी

दिनांक 5 ऑक्टोबर रविवारला, लुंबिनी बुद्ध विहार संभाजीनगर .येथील महिला मंडळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन संभाजीनगर पुसद येथे मोठ्या उत्साहात वर्षावास समाप्ती कार्यक्रम करण्यात आला. मा शरद कांबळे (बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुकाध्यक्ष) वर्षावासात बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचे वाचन केल्यामुळे, लुंबिनी महिला मंडळांनी त्यांचा सत्कार केला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मिलिंद जाधव सर होते, तर प्रमुख उपस्थितीत मा. कोकणे सर, तसेच कांबळे ताई, पाडेनताई, मा धीरे काका,मा. गायकवाड सर होते कार्यक्रमाच्या सुत्रसंचालन कांबळे ताई यांनी केले, तसेच मंदाताई इंगळे यांनी विहारास आठ खुर्च्या धम्मदान म्हणून दिल्या. वर्षावास काळात संभाजीनगर मधील अनेक विद्यार्थी सतत उपस्थित राहत असत व निबंध स्पर्धा शुद्धलेखन स्पर्धा यामध्ये भाग घेत असत त्यामुळे शरद कांबळे सरांनी विद्यार्थ्यांना बक्षीस सुद्धा दिली या कार्यक्रमाला कोकणे सर, शरद कांबळे सर,मिलिंद जाधव सर, यांनी मार्गदर्शन केले तसेच भंते कमल धम्मो यांनी त्रिशरण पंचशील देऊन धम्मदेशना दिली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजीनगर मधील उपासक उपासिका तसेच लुंबिनी महिला मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले कांबळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

