सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
दिनांक १६/०६/०२५ रोजी स्वर्गीय चुनीलाल मोतीभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट यवतमाळ यांच्या सहकार्याने माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन व रुग्णमित्र फाउंडेशन द्वारा आयोजित कान ,नाक, घसा तपासणी शिबिराचे आयोजन कर्मवीर संत गाडगेबाबा स्मृती स्थळ गजानन जाधव यांच्या शेतात पार्डी रोड, निंबी येथे करण्यात आले होते.
सकाळी नऊ ते आकरा या दरम्यान निंबी, पार्डी व सेवादासनगर परिसरातील कान, नाक व घसा या संबंधित व्याधींनी पीडित असलेल्या गरजूं रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर येऊन या शिबिराचा लाभ घेतला.
या वेळेस यवतमाळ येथील तज्ञ डॉक्टर माननीय श्री अनिलजी पटेल यांनी आलेल्या नागरिकांना तपासून त्यांना मोफत औषधी व योग्य सल्ला दिला.
या प्रसंगी माणुसकीच्या भिंतीची सर्व टीम, महिला सदस्या रुग्णमित्र फाउंडेशनचे सदस्य मिशन ग्रीन भवानी माता टेकडी,गीताई केंद्र सदस्य व पुसद परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


