मोहसीन खान:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष 2025-2026 ची सुरुवात उत्साहात व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत पालकांच्या उपस्थित प्रवेशोतस्व व पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शेख कलीम सलीम (प्रमुख स्वच्छता अधिकारी मनपा लातूर) यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व फुगे देवून स्वागत करण्यात आले. तसेच नवीन पहिली वर्गाचे विद्यार्थ्यांचे हाताचे ठसे भिंतीवर घेऊन,शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना गणवेश शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास उपस्थित माजी मुख्याध्यापक हाजी सलीम आळंद सर, शाळेचे मुख्याध्यापिका इनायत काझी मॅडम,इरफाना कुरेशी मॅडम, अफशिया मल्लेभारी (उजलुमवाले)मॅडम,फातेमा शेख मॅडम, तस्लिम शेख मॅडम व सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.


