विदर्भ विभाग प्रतिनिधी: – युसूफ पठाण
वर्धा – वैद्यकीय जनजागृती मंच चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन पावडे सर यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान टेकडी परिसरात ५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सामाजिक भान ठेवत, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. डॉ. पावडे यांच्या मित्रपरिवार, सहकारी, आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी डॉ. पावडे यांना पुष्पगुच्छ व रोपं भेट देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. समाजसेवा, आरोग्य जनजागृती आणि पर्यावरण या तिन्ही क्षेत्रात डॉ. पावडे सरांचे योगदान प्रेरणादायी आहे.

यावेळी बोलताना डॉ. पावडे म्हणाले की, “वाढदिवसाच्या दिवशी निसर्गासाठी काहीतरी करणे ही माझी जबाबदारी आहे आणि पुढील काळात वृक्षसंवर्धन व जनजागृतीचे कार्य अधिक जोमात राबवले जाईल.”
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुस्थितीत पार पडले असून, उपस्थितांचे आभार मानण्यात आले.


