अकोला विभाग प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
अकोला – इंडियन सिल्मबम फेडरेशनची सभा १५ जून २०२५ रोजी स्थानिय हॉटेल जसनागरा येथे आयोजित करण्यात आली. या सभेचे आयोजन महाराष्ट्र सिल्म्बम असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सारवान व इंडियन सिल्मबम फेडरेशन यांनी केली होती. भारतातील 22 राज्याचे अध्यक्ष सचिव या सभेला उपस्थित होते. सभेचे अध्यक्षस्थानी डॉ. एम. राजेन्द्रन IAS हे होते.
तसेच ISF अध्यक्ष कॅप्टन प्रदिप राजे, ISF महासचिव अलगिरी, प्रो. सिल्मबम अध्यक्ष प्रविण कुमार, ISF कोषाध्यक्ष रवि चंद्रन, ISF स्पर्धा टेकनिकल डायरेक्टर सुंदर, ISF सहसचिव सी.मोहन, ISF सहसचिव विजयबाबू, पश्चिम बंगाल सिलम्बमस असो.चे सचिव उज्वल दास, सामाजिक कार्यकर्ते अरविंद भिरड, डॉ. एम. राजेन्द्रन यांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपति शिवाजी महाराज यांची मुर्ती व पुष्प गुच्छे देऊन स्वागत केले.
सहसचिव महाराष्ट्र सिल्मबम वासुदेव वाघ, सभेचे सुत्र संचालन डॉ. खुशबू चोपडे, कार्य. सचिव तथा ISF झोनल सचिव यांनी केले. महाराष्ट्र सिल्मबम असो.चे सौरभ सापधरे, नरेन्द्रसिंग सारवान यांनी सहकार्य केले. या सभेला अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट, मनसे जिल्हा अध्यक्ष राजेशभाऊ काळे यांची उपस्थिती होती. सर्व राज्यातुन आलेले प्रतिनिधी यांचे दि 14 व 15 जून 2025 रोजी त्यांचे राहणे व भोजनाची व्यवस्था हॉटेल जसनागरा अकोला येथे करण्यात आली होती.
सभेमध्ये अंजठा येथे येणाऱ्या 14 व्या राष्ट्रीय सिल्मबम स्पर्धा राष्ट्रीय शिबिर, SGFI सिल्मबम स्पर्धा, राष्ट्रीय रेफरी जॅज यांचे शिबीर, नविन राज्यांना संलग्नता देणे. खेळाडूंना सरकारी सवलत मिळावी याकरिता चर्चा करण्यात आली व सभेचे समापन करण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ISF सहसचिव विजय बाबू यांनी केले.


