अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : एकास अटक
अकोला – अकोला MIDC पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या परिसरातील एका युवकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी कुमारी गावातील राजकुमार चौहान याला काल उशिरा अटक केली आहे.शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कोणतीही अफवा किंवा सोशल मीडियावर फिरणाऱ्या गैरमाहितीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस विभागाने स्पष्ट चेतावणी दिली आहे की, कोणीही सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केल्यास त्या ग्रुपचा व्हॉट्सअॅप अॅडमिन आणि संबंधित सदस्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

