अकोला जिल्हा प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अकोला दौऱ्यावर आहेत. अजित पवार हे तब्बल 14 वर्षानंतर अकोल्याला येत आहे. अजित पवार अकोला आणि जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा नियोजन भवनात घेणार आहेत.
यानंतर शहरातील पोलिस लॉन येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहेय तर या ठिकाणी काही पक्षप्रवेश सुद्धा होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शहरात ठीक ठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजि महापोर मदन भरगड व महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


