बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी: – सुनील वर्मा
लोणार ते वेणी पाणंद रस्त्याचे काम होण्यासाठी तहसीलदार दालनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठिय्या आंदोलन.
लोणार ते वेणी पाणंद रस्ता हा मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मंत्रालय मुंबई कडून २३ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय काढून पान क्रमांक ०३ वर अनुक्रमांक ३४ नुसार मंजूर करण्यात आले होते त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून २३ सप्टेंबर २०२३ रोजी आंदोलन करून सदरील रस्त्याचे काम होण्यासाठी आंदोलन केले व तहसीलदाराने सदरील काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले परंतु आजपर्यंत सदरील पानंद रस्त्याचे काम सुरू झालेले नाही पावसाळ्यात या रस्त्यात गाडी घोडी तर काय पाई सुद्धा चालता येत नाही.
म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे, शहर प्रमुख गजानन जाधव सर, ज्येष्ठ शिवसैनिक सुदनजी अंभोरे, शहर संघटक तानाजी मापारी, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, अल्पसंख्यांचे अश्फाक खान, इकबाल कुरेशी, फहीम खान, मोहम्मद नसीम, अशोक मापारी, मोहम्मद नसीम, शेख कलीम, वसीम शेख, शेख अल्लाबक्ष, शहाबाज अली, शेख मतीन, शेख मदार, शेख वाजिद, शेख अल्ताफ, शेख नदीम, माजी नगरसेवक श्याम राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले

