गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
मुलचेरा तहसील अंतर्गत येणाऱ्या गोमणी या गावात एकच बस स्थानक परिसरात अस्वच्छता जबाबदार कोण आहेत असा नागरीकांना प्रश्न पडतो. वेळेवर बसेस उपलब्ध नाहीत आणि गोमणी परीसरातील प्रवाशांना त्रास निर्माण होतोय , या बस स्थानकावर घाण कचरा व बैल गोडे तीथेच घराचे कवेलू सुद्धा आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना इथे तिथे जाऊन बसावे लागते आणि वेळेवर बसेस उपलब्ध होत नाही. प्रशासकीय विभाग थोडं लक्ष देउन या गोमणी गावातील बस स्थानकावर साफ सफाई कामगार लावून सफाई करायला हवे असे मत व्यक्त केले जात आहे.
नागरिकांना मुलचेरा तहसील कार्यालय किंवा अहेरी तहसील तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या कामांसाठी जावे लागते परंतु प्रशासनाणे वेळेवर बसेस उपलब्ध नसल्याने नागरिक जातील तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होते?
तसेच सद्य स्थितीत इयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी गोमणी येथील काही विद्यार्थी बाहेर जातील एडमिशन करण्यासाठी परंतु बस स्थानकावर बसून बसून थकवा येतो परंतु बस सेवा उपलब्ध नाही, सकाळी ११ वाजता पासून बसून असतात प्रवासी वाहतूक उपलब्ध करून देत नाही,असा प्रशासनाचा दुर्लक्ष करून चालणार नाही तर लवकरात लवकर या बस स्थानकांची दुरुती द्यावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे..


