विदर्भ विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
काल वर्धा येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष जाचक शेतकरी योद्धा अमोल ठाकरे ग्रामपंचायत सदस्य आशिष कोल्हे माझी पोलीस सिद्धार्थ ताकसांडे यांनी गुरुकुंज मोझरी येथे जाऊन बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
तसेच त्यांच्या प्रकृती विषयी विचारपूस केले त्यावेळेस बोलताना सामाजिक कार्यकर्ते आशिष ज्याचक म्हणाले की सरकारने या विषयाकडे एक ते दोन दिवसात गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आम्ही सुद्धा वर्धेला आंदोलनाची सुरुवात करू व गावागावात जाऊन प्रचार सभा करून महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वनवा पेटवू तसेच यामध्ये सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता एकत्रित येऊन लढा उभारण्याची गरज आज निर्माण झाली आहे नाही तर येणाऱ्या पुढील काळात अशा आंदोलकाची गडचेपी होऊन समोर भविष्यात कोणीही आंदोलन करण्यास तयार होणार नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या गावात हक्कासाठी बच्चू भाऊच्या समर्थनार्थ उभे राहण्याची गरज आहे.


