अकोला जिल्हा प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकोला विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय खोडके, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, पोलिस अधीक्षक अर्जित चांडक यांनी स्वागत केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक, दुपारी १२ वा. पत्रकार परिषद नंतर मोटारीने पक्ष कार्यालयाकडे प्रयाण, दुपारी २.३० वा. पोलीस लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा, सर्व कार्यक्रम आटोपून दुपारी ४ वा. खामगावकडे प्रयाण करतील.
अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.


