महाक्रांती न्यूज नेटवर्क: – युसूफ पठाण
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नवनिर्वाचित राज्य प्रधान सचिव मा विनायक साळवे,शहादा जि नंदुरबार यांच्या वर्धा शाखेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल व त्यांची निवड झाल्याबद्दल वर्धा जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष मा बाबाराव किटे यांनी पुष्पगुच्छ देऊन वर्धा वर्धन हाट झुनका भाकर केन्द्राचे सभागृह येथे आयोजित बैठकीत स्वागत केले
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 365 च्या वर शाखा मधून 450 च्या वर कार्यकर्ते पदाधिकारी गडचिरोली ते रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून शहादा जि नंदुरबार येथे तिन दिवस एकत्रित येऊन सर्व कामकाज संपवून 1जून ला 2025 ते 2028 अशी तिन वर्षा करीता सर्व संमतीने राज्य कार्यकारिणी निवडण्यात आली यात विनायक साळवे यांची व गजेंद्र सुरकार यांची राज्य प्रधान सचिव म्हणून निवड करण्यात आली निवडी नंतर प्रथमच वर्धा शाखेला त्यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे शहर शाखा अध्यक्ष अरूणभाऊ चवडे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी विनायक साळवे यांनी जिल्हा व शहर शाखा यांच्या कार्याचा अहवाल जिल्हा कार्याध्यक्ष अरूण भोसले यांच्या कडून समजावून घेतला सोबतच उपस्थित सदस्यांनी मनमोकळेपणाने यांनी अडी अडचणी, समस्या उपक्रम कार्यक्रम याबाबत चर्चा करून मन मोकळे केले यावर सावळे यांनी मार्गदर्शन केले तर 2025 ते2028 या तिन वर्षासाठी राज्य कार्यकारणीत राज्य पदाधिकारी म्हणून स्थान पटकविणारे गजेंद्र सुरकार यांची राज्य प्रधान सचिव पदी, डॉ हरिश पेटकर ,सारिका डेहनकर, प्रकाश कांबळे, डॉ माधुरी झाडे यांची राज्य पदाधिकारी म्हणून वेगवेगळ्या विभागावर नेमनुक झाली याबद्दल या सर्वांचे विनायक साळवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच वर्धा जिल्हा शाखेतील भरत कोकावार, जिल्हा प्रधान सचिव, व्दारकाताई ईमडवार महिला विभागाच्या कार्यवाह व शहर शाखेचे अध्यक्ष अरुणभाऊ चवडे यांना लक्षवेधी पुरस्कार मा सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते सम्मान करण्यात आल्या बद्दल त्यांचाही विनायक साळवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण भोसले यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनील ढाले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता लोहट,तनू वराडे, दिलीप गुळघाणे ,गजानन पखाले, पंजाब सिराम, ॲड सिराम,लोहट सर आदींनी परिश्रम घेतले.


