प्रथम शेतकरी म्हणून डॉ.अशोक थोडगे यांचा केला सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी / कविता धुर्वे
राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ज्वारी खरेदीचे आज दिनांक १२/६/ २०२५ रोज गुरूवारला दुपारी दोन वाजता बस स्थानकाजवळच्या शासकीय गोदामात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांच्या हस्ते रितसर काटापुजन करून शेतकरी डॉ अशोक थोडगे यांचा प्रथम शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला.
त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती इंजिनियर अरविंद वाढोणकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले उपाध्यक्ष भरत पाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर, सुधीर जवादे, शासकीय पुरवठा अधिकारी पाटील साहेब, वैकुंठ मांडेकर,दापोरी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनोदराव जयपूरकर, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष संजय देशमुख, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर , श्रीधर थुटुरकर सर,पवन छोरीया, आणि शेतकरी दशरथ गोटेफोडे, लक्ष्मण बेलखेडे, प्रदीप चिव्हाणे, मयूर भोयर, तसेच खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक संजय जुमडे कर्मचारी गणेश हिवरकर आणि इतर मान्यवर मंडळीं आणि शेतकरी बंधू उपस्थित होते.
आजच्या दिवसांपासून शासनाच्या वतीने ज्वारी खरेदी सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले.


