अकोला विभाग प्रतिनीधी:- गणेश वाडेकर
स्व.प्रा तुकाराम भाऊ बिडकर यांचे हेंडज येथील तंत्रनिकेतन पॉलिटेक्निकल कॉलेजला नाव देण्यासाठी अजित दादांना निवेदन
अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रा. तुकाराम भाऊ बिडकर यांचे हेंडज तालुका मुर्तीजापुर येथील तंत्रनिकेतन पॉलिटेक्निकल कॉलेजला नाव देने संदर्भात मागील चार महिने अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार हे तुकाराम भाऊ बिडकर यांच्या घरी सातवन पर भेटीदरम्यान त्यांना प्रा तुकाराम बिडकर यांच्या समर्थकांनी व जय बजरंग परिवारातर्फे निवेदन देण्यात आले होते.
ते नाव अर्ध्यापर्यंत न दिल्याने अजितदादांनी तत्काळ त्यावर कारवाई करावी अशा अशयाचे निवेदन अजित दादा पवार यांना आज अकोला दौऱ्यावर आले असता त्यांना देण्यात आले.

यावेळी श्रीमती राधाताई बिडकर प्रा. शत्रुघ्न बिडकर , गजानन म्हैसने,अनिल मालगे ,सदाशिव शेळके, महादेव साबळे ,विनोद मिरगे ,विजय उजवने,विजय म्हैसने,विजय पचारे.मेहरे, विलास इंगळे, चक्रधर राऊत,सुरेश बोचरे,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जय बजरंग परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अजित दादा पवार यांनी यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.


