विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
आदित्य नारनोली यांचे बजाज चौक वर्धा येथील रेल्वे पुलाजवळ श्री सिध्दीविनायक इंटरप्राईजेस नावाचे भंगार दुकान व गोडाऊन असुन, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे भंगार दुकानातील गोडाऊनचे शटर तोडुन त्यामध्ये प्रवेश करून मुद्देमाल गुन्हा नोंद करण्यात आला होता..
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्था.गु.शा. वर्धा चे पथक करीत होते. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सौ. नंदिनी मिटकर हिला तिचे राहते घरी जावुन चेक केले असता, तिचे राहते घरी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल मिळुन आल्याने, तिला गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता, तिने स्वतः व तिचे इतर 04 महिला साथीदारांनी संगणमतकरून सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने, त्यांचे ताब्यातुन 1) तांबा वजन 78 किलो कि. 55,794 रू, 2) कुलर व फॅनचे मोटारमधील खराब असलेला तांब्यांचे तार वजन अंदाजे 20 किलो कि. 15,000 रू असा जु.कि. 70,794 रू चा मुद्देमाल जप्त करून, सदर चोरीचा गुन्हा उघडकिस आणला असुन, आरोपी नामे 1) सौ. नंदिनी करण मिटकर, वय 21 वर्ष, 2) सौ. रेखा नितेश काळे, वय 28 वर्ष, 3) सौ. भारती हिरा ईटकर, वय 27 वर्ष, 4) सौ. साधना राजा केतवास, वय 21 वर्ष, 5) सौ. अर्चणा आकाश देवकर, वय 24 वर्ष, सर्व रा. गिट्टीखदान बोरगाव (मेघे) वर्धा यांना पोलिसांनी अटक केली.
व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी पो.स्टे. वर्धा शहर यांचे स्वाधीन करण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निबोंळकर, निलीमा उमक, दिनेश बोथकर, महादेव सानप, पवन पन्नासे, गजानन दरणे, रवि पुरोहित, राहुल लुटे, विनोद कापसे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.


