प्रतिनिधी: – नागनाथ लांजे
महाक्रांती न्यूज नेटवर्क: – B787 हे विमान अहमदाबाद वरून लंडन ला जाण्यासाठी उडान घेतले होते उडान घेताच हे विमान क्रॅश झाले आहे या विमानात 242 प्रवाशी 2 पायलट 12 कर्मचारी होते, हे विमान अहेमदाबाद मधील मेघाणी नगर परिसरात कोसळे आहे दरम्यान ज्या इमारतीवर कोसळले आहे ती इमारत रुग्णालयाची होती यामध्ये 15 डॉक्टर व काही रुग्ण जखमी झाले आहेत दुर्घटनास्थळी भारतीय भारतीय सैन्याकडून बचाव कार्य सुरू होते,
हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानातील कर्मचाऱ्यांनी उड्डाण घेतल्यानंतर लगेचच “मेडे” असा त्रासदायक संदेश पाठवला. विमानतळाच्या बाह्य सीमेपलीकडे विमान कोसळण्यापूर्वी कोणताही संपर्क झाला नाही,
या घटनेची माहिती मिळाताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा आणी नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दोन्ही मंत्र्यांना मदत कार्याचे निरीक्षण करण्यासाठी अहमदाबादला जाण्याचे निर्देश दिले आहेत.
पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना बाधितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि बचाव आणि तपासाचे प्रयत्न जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.

