( महाक्रांती न्यूज नेटवर्क): – सहयोग कल्याणकारी बहुउद्देशिय संस्था, नागपूर द्वारा डॉ. भदन्त राजरत्न यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा शहरामध्ये राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळावा आयोजीत 28 सप्टेंबर रविवारी रोजी दुपारी 12 ते 4 या दरम्यान, सम्यक दृष्टी बुध्द, विहार, नालंदा नगर, महिला आश्रमच्या समोरचा रोड, वर्धा येथे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांसद मा. अमर काळे वर्धा, रणजित कांबळे माजी आमदार, देवळी, वर्धा यशवंतराव झाडे, शेतकरी कामगार पक्ष, वर्धा प्रमोद सोमकुंवर यांनी प्रथमच वर्धा शहरात बौध्द वधु- वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले असुन या मेळाव्यात विशेष करून डॉक्टर, वकील, इंजिनियर क्सास 1, 2, 3, चे सरकारी अधिकारी, कर्मचारी, निमसरकारी, प्रोफेसर, शिक्षक, मॅनेजर, उच्चशिक्षित, पदविधर, शेतकरी, व्यवसायिक आणि प्रथम वधु-वर, घटस्फोटीत, विधूर, विधवा, अंपग व सामाजातील अनेक क्षेत्रातील स्थळे या ठिकाणी भेटतील. असे आयोजकांनी सांगितले.
संपर्क:- प्रमोद सोमकुंवर -9373617114


