एमआयएम पक्षाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
गडचिरोली जिल्ह्यात व तालुक्यात अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडला आहे
अगोदरच पावसामुळे झालेले नुकसान आणि आता युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना युरिया खत करिता वन वन भटकंती करून दुप्पट, तिप्पट भावाने युरिया खत विक्री करून शेतकऱ्यांची भरमसाठ लूट करण्यात येत आहे
युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून
शासनाने तात्काळ युरिया खत उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एमआयएम जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, युवा आघाडी शहर अध्यक्ष मुन्ना रामटेके,युवा नेते मुस्ताक सय्यद, करणं मोहुर्ले, महिला कार्याध्यक्ष शगुफ्ता शेख, किरणं सहारे, प्रीतम मेश्राम, श्रुतिक बावणे, यश सरोदे आदी. उपस्थित होते.

