राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव शहरात शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमधून येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांत शाळा व महाविद्यालये सुरू होत असताना बस स्टँड, रावेरी पॉइंट, कला वाणिज्य कॉलेज, इंदिरा कॉलेज, विरांनी सायन्स कॉलेज, न्यू इंग्लिश हायस्कूल तसेच इतर शैक्षणिक संस्थांच्या मार्गावर काही बाईकस्वार युवक शाळकरी मुली आणि विद्यार्थिनींना त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
याशिवाय मध्यवर्ती बँक समोर काही युवक मध्य प्राशन करून डिवायडरवर बसत असून, त्याचा त्रास शाळकरी मुली व ग्रामीण लोकांना सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालयात ये-जा करताना सुरक्षितता धोक्यात येत आहे. रोड रोमिओ, बेकायदेशीर जमाव, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यांच्याकडून होत असलेल्या त्रासामुळे पालकांमध्येही चिंता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी योग्य ती कडक कारवाई करून बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली. उपजिल्हा प्रमुख विनोद काकडे व तालुका प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख इमरान पठाण यांच्या नेतृत्वात राळेगाव पोलीस स्टेशनला PSI बोरकर यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी शहर प्रमुख इमरान पठाण , उपशहरप्रमुख दिपक येवले, सुनील सावरकर, महिंद्र तुमाने, शाखा प्रमुख अंकुश गेडाम, शहर संघटक योगेश मलोंढे, निशी पोंगडे, जीवनानरावजी रामगडे, किशोर कापसे, आशिष मरापे, राहुल चव्हाण, आदेश आडे, गौरव ठाकरे, अनिस शेख, प्रतीक देवतळे, स्वप्नील पुरी, दया आडे, ओम सगमाने तसेच महिला आघाडीच्या सुनीताताई ढगले, अनिताताई कांबळे, माया ताई सगमाने, किरण ताई घुणे, वंदना ताई पेंद्राम, काजल ताई पुरी उपस्थित होत्या.
शहरातील शिस्तभंग करणाऱ्या रोड रोमिओंवर त्वरित कारवाई करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

