गणेश वाडेकर:- अकोला जिल्हा प्रतिनीधी
अकोला :जिल्ह्यातील दाळंबी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. दाळंबी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत असल्याचं गावकऱ्यांचे म्हणणं आहे.
काही दिवसांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले मात्र आता पाणी पुरवठ्याचे काम ठप्प झाल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. तर गावातील टाकी चे काम पूर्ण झाले आहे. मात्र पाण्याची टाकीत विद्युत पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याचं गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
अखेर गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे.नंतर सिईओ मॅडम यांनी तिनं दिवसात तुमचा पाण्याचा प्रश्न सुटेल असे आश्वासन दिले..यावेळी या भागाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या तथा राष्ट्रवादी नेत्या प्रतिभा अवचार यांचेसह माजी सरपंच बयाबाई मांडोकार,ग्रामपंचायत सदस्य मधुकर गोपनारायण ,गजानन मांडोकार,मुबारक शहा,रशिद शहा,हबीब शहा,अप्पा तांबे,धोंडीराम मांडोकार,कलाबाई शिंदे,पंचकुला पवार, गयाबाई सनिसे यांचेसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…



