गणेश वाडेकर:- अकोला जिल्हा प्रतिनीधी
बाळापूरः लाखनवाडा येथील ४० वर्षीय गणेश ऊर्फ पिंटू गावंडे याने निंबी मालोकार शेतशिवारातील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी उशिरा उघडकीस आली.
बाळू गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वाडेगाव येथून पो. क. प्रतापसिंग राठोड व भरत गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पंचनामा करण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
पुढील तपास पोलीस करत आहेत.


