बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा
लोणार :-सुलतानपूर ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून. ग्रामपंचायत मध्ये दररोज नागरिकांचे कामे पडतात परंतु ग्रामपंचायत अधिकारी हे कार्यालयामध्ये हजर नसतात. व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता बेकादेशीरपणे ठराव देणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, महिला ग्रामपंचायत सदस्यांना उध्दटपणाची वागणूक देणे, माहिती अधिकार अर्जदाराला माहिती अधिकारांमध्ये माहिती न देणे व त्या अर्जदाराला माहिती अधिकाराने काय होते

अशी उडवाउडवीची उत्तरे देणे, विकास कामाच्या संदर्भात अनिमित्तता ठेवून बोगस कामे करणे, सरपंचपती यांच्यासोबत संगणमत करून भ्रष्टाचार करणे. अशा विविध कारणामुळे भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा दोन दिवसाच्या नंतर ठिय्या आंदोलण करण्याचा इशारा देण्यात येत आहे.
निवेदनावर ९ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नागवंशी संघपाल पनाड मेहकर-लोणार विधानसभा नेते,
सौ. रुपाली दिपक राजगुरू,
सौ. सिमा संतोष पवार,
सौ. सुनिता ज्ञानेश्वर हरकाळ,
संतोष राधाकिसन शिंदे,
जैबूनबी शेख अहमद,
राजेका परवीन जियाउल्ला,
सुमन मारोती पनाड,
सरस्वती वसंता निर्मळे


