वारंवार लाईन खंडित होत असल्यामुळे दिले गावाकऱ्यांनी निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-कविता धुर्वे
रिधोरा गावातील विद्युत सतत खंडित होत असल्या मुळे गावातील नागरिकांनी घेतली महावितरण कार्यालय वडकी येथे धाव घरातील उपकरणे लहान मुलांना होणारा त्रास तसेच आजारी वय वृद्ध वेक्तींना होणारा त्रास गावातील शेतकऱ्याच्या ऑनलाईन कामामध्ये व्यक्तंय येत असून महावितरण कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष होत असून त्या कर्मच्यांऱ्यांना काही अडचणी सांगितल्यास नागरिका सोबत उद्धट उत्तर देतात गावातील विद्युत प्रवाहच्या पेठ्या अस्ता वेस्ट झाल्या आहे त्याकडे सुद्धा दुर्लक्ष आहे गावातील एखादी फेज गेला असता गावातील नागरिकांना स्वतः जाऊन फेज टाकावा लागतो
आपल्या जीवावर बेतून हे सर्व काम करावे लागत आहे या मध्ये काही जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण या सर्व बाबीचा आढावा घेऊन त्वरित यावर कार्यवाही करावी कार्यवाही न झाल्यास जनंदोलन करण्यात येईल असा इशारा रिधोरा गावातील नागरिकाने महावितरण वडकी यांना निवेदना द्वारा देण्यात आला आहे
यावेळी गावातील (सरपंच) उमेश गौरकार, अमोल गौळकार,सागर निरगुडवर (लोकमत वार्ताहर) गोपीचंद वाढाई मयूर पंडिले,सुमित मेघरे गणेश गौळकार(सकाळ वार्ताहर) विवेक तोडासे,शुभम येरणे,नयन आदे, गणेश गाताडे,प्रमोद किन्हेकार,वृषील शेन्डे, सुरेश गाऊत्रे,विकास पंडिले,संस्कार गाऊत्रे,चंद्रशेखर लेणगुरे इत्यादी गावातील नागरिक उपस्थितीत होते.

