लातूर जिल्हा प्रतिनिधी: – मोहसीन खान
बुवा साळवे हे वासुदेव बळवंत फडकेंचे शस्त्रगुरु होय…ते मातंग समाजातील होते… पूर्वी पेशव्यांच्या सैन्यात असलेले साळवेबुवा अत्यंत शूर आणि लढवय्ये होते…१८१८मध्ये पेशवाई खालसा झाल्यावर त्यांनी पुण्यातून अनेक तरुण शस्त्र शिक्षण देऊन तयार केले…
आज त्यांची सुद्धा पुण्यतिथी आहे हे फेसबुक मित्र शिवराज भोसले यांच्यामुळे कळले…त्यांना धन्यवाद….
वासुदेवरावांनी, लहूजी बुवा आणि महार समाजातील राणबा वस्तादांकडून शस्त्र चालविणे,घोडा फेकणे, दांडपट्टा चालवणे,बंदुका चालवणे,अनवाणी पावलांनी काट्या-कुट्यातून धावणे,तलवार तोंडात धरून कडा चढणे-नदी पोहून जाणे आदी अनेक प्रकार शिकून घेतले….
महत्वाचे म्हणजे सव्वाशे वर्षांपूर्वी ब्राह्मण समाजातील एक पुणेकर तरुण या दोघांकडे हे शिक्षण घ्यायला जातो ही आजच्या काळात अविश्वसनीय वाटणारी गोष्ट नव्हे काय..? त्या काळातील एका ब्राह्मणाला या उभयतांकडून शिक्षण घेणे कमीपणाचे वाटले नाही आणि त्या दोघांनीही बामणाला कसे शिकवू असा विचार केला नाही…विशेष म्हणजे फडकेंना त्यांच्या जातीबांधवांनी या कृत्याबद्दल बहिष्कृत केले नाही.. या एका उदाहरणावरून आपल्याकडे त्या काळातील विचित्र चित्र जाणीवपूर्वक उभे केले जाते हे कळावे..
त्या काळात जाती होत्या पण द्वेष नव्हता,स्वातंत्र्योत्तर काळात जाती मोडाच्या घोषणा देत केवळ जातीय द्वेषच पसरवला जातो..जो संपूर्ण समाजासाठी घातक आहे….
….हे लक्षात घेतले की या सर्व लोकांचे मोठेपण अधोरेखित होते…या दोघा गुरु-शिष्यांचा पुण्यस्मृतीदिन एकच असावा हा योगायोग विलाक्षणच …
लहूजी बुवांना विनम्र आदरांजली….!!

