गणेश राठोड
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरात सर्वात जास्त कर भरला जातो पण नागरिकांकडून कर घेऊन सुद्धा नगरपंचायत नागरिकांना सुविधा देत नाही. नगर पंचायत ढाणकी ने नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना सन 2023ते 2024 अंतर्गत सुभाष वाईन बार ते गजानन जिल्हावार यांच्या घरापर्यंत झालेला रस्ता दोन महिन्याच्या आत खराब झाला असून याच रस्त्यावर ऐ. पी. जे. अब्दुल कलाम चौक येथे केलेल्या गटाराला झाकण नाही.त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहे . याच ठिकाणी दवाखाना असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक वाहाने घेऊन येत असताना त्या खड्यामुळे वाहनाचे अपघात होत आहे.आज रस्त्याने शोएब खान यांचा मुलगा येत असताना रस्त्यावरील उघड्या गटारात पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. रस्त्याच्या मधोमध उघडे गटार असून त्यात एक वृद्ध पडून काही दिवसांपूर्वी जखमी झाले होते . या उघड्या गटारात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर याची जबाबदारी नगरपंचायत अधिकारी स्वीकारणार का?. एखादी दुर्घटना घडल्यावर नगरपंचायत अधिकारी जागे होणार आहे का?असा सवाल नागरिक करत आहे.अशा गंभीर समस्येकडे नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. यात पडून एखादा जीव जाण्याच्या आधी नगरपंचायत मुख्य अधिकारी यांनी दखल घेऊन यावर झाकण बसवावे असे साकडे घालण्यात येत आहे.
उमरखेड तालुक्यात ढाणकी येथील नागरिक नगरपंचायत ला सर्वाधिक कर देतात . परंतु पायाभूत सुविधा, रस्ते, काम न होणारे रस्ते आणि पथदिवे, हायमास्ट लाईटिंग पोल सर्व आवश्यक ठिकाणी बसवलेले नाहीत, पूर्णपणे बंद आहेत आणि अपूर्ण उघडे गटार आहेत! कठोर कारवाईची आवश्यकता आहे.
शे. जब्बार भाई
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष