वर्धा विदर्भ प्रमुख युसूफ पठाण
.
13/08/25 रोजी वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांच्या कडून संशयित मोटार सायकल तपासनी करणेस धुनिवाले चौकात एक संशयित लावारीस मोटार सायकल हिरो होंडा डिलक्स MH 31 DY 3720 ही मिळून आलेली होती
त्या वरून मालकाचा शोध घेतला असता मालक लोकपाल ओमप्रकाश यादव हुडकेश्वर नागपूर यांनी सदर मोटारसायकल ही त्यांचीच असून 5/6/25 रोजी नागपूर येथून चोरीस गेल्याचे सांगितले त्यावरून पो. स्टे. नागपूर MIDC येथे अप. नंबर 609/25 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा ही दाखल करण्यात आलेला होता सदर मोटार सायकल आज रोजी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा यांनी मो सा मालक व नागपूर MIDC पोलिसांना तपासकामी परत केली आहे, मोटार सायकल मालकास त्यांची चोरी गेलेली मोटार सायकल सुस्थितीत परत मिळाल्याने त्यांनी वाहतूक पोलीस अंमलदार. ASI रोशन पांडे व सुनील चोपडे यांचे आभार व्यक्त केले

