अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हेरिटेज हॉटेलमध्ये लग्नसमारंभ दाग दागिने आणि रोख लंपास केल्याची घटना समोर आली.
फिर्यादी राहुल खेळकर यांच्या नातेवाईक प्रतिभा रवींद्र सुर्वे या महिलेने पर्स नवरदेव आणि नवरीच्या सोप्याच्या बाजूला ठेवली होती.
संधीचा फायदा घेत पर्स लंपास केली.
पर्समध्ये 50 ग्रामचे सोन्याची पोत, एक मोबाईल, एक नथ आणि 80 हजार रोख असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला.
घटनास्थळी जुने शहर पोलिस दाखल होऊन पंचनामा केला. पुढील शोध सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे सुरु आहे?


