राळेगाव :-आज स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ द्ववारे मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे मौजा. लोणी. ता. राळेगाव येथे मोठ्या प्रमाणात शासन मान्यता नसलेल्या बोगस कपाशी बियाण्याची विक्री होत असल्याच्या माहीतीच्या आधारे पंचायत समिती, राळेगांवच्या कृषी अधिकारी मनिषा पाटील यांनी प्रशांत विठ्ठलराव भोकटे वय ४४ वर्ष यांचे घराशेजारील शेडमध्ये धाड टाकुन अनधिकृत व शासन मान्यता नसलेले बोगस कपाशी बियाणेचे एकुण ५० पाकिटे जप्त केली.
जप्त केलेल्या कपाशी बियाण्याची एकूण किंमत ५.४००००/- असून केलेल्या कार्यवाहीबाबत पोलिस स्टेशन, राळेगाव येथे FIR हाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही कृषीविकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ, व उपवि कृषी विकास अधिकारी, जि.प यवतमाळ, उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ, व मोहीम अधिकारी. यांचे मार्गदर्शनात करण्यात आलं आहे..
सदर कार्यवाही निलेश भोयर पंचायत समिती कळंब, राहुल वंजारी, विस्तार अधिकारी (कृषी) पंचायत समिती, राळेगाव यांचे चमुने यशस्वीरित्या पार पाडलं आहे.. शेतकऱ्यांनी कपाशी व इतर बियाणे परवानाधारक अधिकृत दुकानदारांकडूनच खरेही करुन बियाण्या संदर्भात होणाऱ्या फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन पंचायत समिती राळेगावच्या कृषी अधिकारी मनिषा पाटील यांनी केले आहे….
लोणी येथील पोलिस पाटील पदावर काम करणाऱ्या प्रशांत विठ्ठल भोकटे हे अनेक वर्षांपासून अनधिकृत बियाणे विकण्याचा अवैध व्यवसाय करत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून या अवैध धंद्यातून खूप मोठी आर्थिक उलाढाल दरवर्षी करुन मालामाल झाल्या ची चर्चा आज माडपट्टी परिसरात सुरु होती..असे अनेक महाभाग हा अनधिकृत बियाणे विकण्याचा अवैध व्यवसाय करताना निदर्शनास येतं आहे आणि शेतकऱ्यांना गोड बोलून हे अनधिकृत बियाणे पेरणीसाठी भाग पाडत आहेत हे विशेष…