अकोला जिल्हा प्रतिनीधी: -गणेश वाडेकर
पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळा चे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप भाई कवाडे यांनी विदर्भ हॉस्पिटल अकोला येथे ICU मध्ये अति दक्षता विभागामध्ये त्यांची व त्यांच्या परिवाराची भेट घेतली.
या वेळी विदर्भ हॉस्पिटल येथील डॉ.उमेश गडपाल यांच्याशी शेषरावजी अंभोरे यांच्या तब्बेती बाबत विचारपुस केलीशेषरावजी अंभोरे यांच्या धर्मपत्नी सौ. सुनंदा शेषराव अंभोरे,मोठा मुलगा बुद्धिवान शेषराव अंभोरे,दूसरा मुलगा भूषण शेषराव अंभोरे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, अकोला जिल्हाध्यक्ष नागसेन क्षिरसागर उपाध्यक्ष अनिल भाऊ गवई शहर अध्यक्ष हिम्मतराव हिवराळे, अकोला जिल्ह्या चे नेते नितेश भजगवरे,युवक आघाडी चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष ठवरे, ओ.बी.सी सेल चे नेते स्वप्निल वाडीभास्मे आदि उपस्थित होते.


