अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अकोट फाईल हद्दीतील पुरपीडीत कॉलणी येथे जुगार रेड केली असता चार इसम, डाबकी रोड हद्दीतील शिवनगर अकोला येथे २ इसमांना तसेच खदान हद्दीतील दोन आरोपी अशा वेगवेगळ्या कारवाई मध्ये एकुण ८ आरोपी सह २९ हजार ७३० रूचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक शाखा प्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.

