बाईक स्वार यांच्या अपघातास जबाबदार कोण??
महाक्रांती न्यूज नेटवर्क प्रतिनिधी : नागनाथ लांजे
अहमदपूर शहराच्या जवळ असलेल्या वाकी नदीवर काटेरी झुडपे वाढले असून या काटेरी झुडपांमुळे टू व्हीलर अपघात होत आहेत या सर्व बाबी रोड प्रशासनास माहीत असून देखील या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे रोड लगत थाटलेली धाबे यामुळे दोन चाकी धारक रोडवर येतात व भरधाव जाणाऱ्या गाड्यान मुळे अपघात होत आहेत
या सर्व बाबी पोलीस प्रशासनास माहिती असताना देखील प्रशासन मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवून सर्व पाहत आहेत.

रोडवर टाकला जाणारा कचरा , तिथेच अतिक्रमाण करून थाटलेली धाबे व तसेंच नाल्यांवर थाटलेली दुकाने याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष का आहे?
अपघात झाल्यास जबाबदार कोण?

